हनुमान सागर धरणात ३६ टक्के जलसाठा शिल्लक;गेल्यावर्षीच्या तूलनेत ६ टक्क्यांनी जलाशय पातळी खालावली…धरणावरून शेकडो गावातील लाखो नागरिकांची तहान अवलंबून

Share

V 24 Taa

संग्रामपूरः- अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणात ७ मे पर्यंत ३५.९६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ७ मे २०२३ ला या धरणात ४२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी धरणाची जलाशय पातळी खालावली आहे.

सद्यास्थितीत धरणात २९.४७ दलघमी जलसाठा उपलब्ध असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून पुढील ६ महिने पूरेल ऐवढा पाणी शिल्लक आहे. दरम्यान वारी भैरवगड येथील हनूमान सागर धरणावर अकोला, बूलढाणा जिल्ह्यातील शेकडो गावातील लाखो नागरिकांची तहान अवलंबून आहे.

या धरणावरून अकोला जिल्ह्यातील ८४ तसेच बूलढाणा जिल्ह्यातील जळगाव शहरासह संग्रामपूर, जळगाव जा. या दोन तालुक्यातील १४० गाव पाणी पुरवठा योजने अंतर्गत १४७ गावे तसेच शेगाव शहराला भूमिगत जलवाहिनीच्या माध्यमातून दररोज शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सूरू आहे. सद्यस्थितीत या धरणात ६ महिने पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

या धरणातून महिन्याला सरासरी ३.१५८ घलघमी पाणी पिण्यासाठी लागत असल्याचे आढळून आले आहे. तर खारपानपट्टा असलेल्या बुलढाणा जिल्हयातील, संग्रामपूर, जळगाव जा., शेगाव हे ३ तालुके आहेत. अकोला जिल्हयातील तेल्हारा, अकोट तालुका व शहर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या तालुक्यांना पिण्याच्या पाण्याचे एकूण ३७.९०७ दलघमी वार्षीक पाणी आरक्षित आहे.

यामध्ये पाणी आरक्षण अकोट शहर ८.६६ दलघमी, तेल्हारा शहर ३.१६ दलघमी, शेगाव शहर ५.६२ दलघमी, जळगाव जामोद शहर ४.०२ दलघमी, संग्रामपूर जळगाव जा. तालूका १४० पाणी पुरवठा योजना संग्रामपूर शहरासह ८.४५४ दलघमी, अकोट तेल्हारा तालुका ८४ खेडी पाणी पुरवठा ४.२३९ दलघमी, तेल्हारा अकोट प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ३.७५३ दलघमी पाणी वापर सद्या आहे. एकूण पाणी वापर ३७.९०६ दलघमी एवढा आहे.

मात्र सद्या धरणात जीवंत पाणी साठा २९.४७ दलघमी एवढा आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता एकूण ८१.९५५ दलघमी एवढी म्हणजे ४१२ मीटर एवढी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *