सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह १२ नेते भाजप प्रवेश करणार… अतुल लोंढे यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ…

Share

V 24 Taas न्युज नेटवर्कर

लोकसभा निवडणुका जशजशा जवळ येतील तशा राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह अजित दादा गटाचे १२ नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते अतुल लोंंढे यांनी केला आहे. एक्स माध्यमावर ट्वीट करत अतुल लोंढे यांनी हा सर्वात मोठा दावा केला आहे.

काय म्हणालेत अतुल लोंढे?

“धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपाने ठगा नही! सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार, असे अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी त्यांच्या एक्स माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार! अजित दादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार,” असेही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सध्या त्यांच्या या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

निलेश लंकेंच्या प्रवेशाची अफवा; स्वतःच केला खुलासा!

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. लवकरच निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, असे सांगण्यात येत होते. मात्र या सर्व अफवा असल्याचे सांगत मी अजित दादांसोबतच आहे… असे स्पष्टीकरण स्वतः निलेश लंके यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *