शेतकरी होणार समृद्ध! सरकारच्या ‘या’ योजनांचा घ्या फायदा…शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन विविध योजना राबवते. आपण या योजनांबद्दल जाणून घेऊ या…

Share

V 24 Taas न्युज नेटवर्कर

आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकार अनेक योजना राबविते. सरकारतकडूम शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणं, तसंच शेतीत करताना येणाऱ्या अडचणींवर मात करणं हा या सरकारचा उद्देश आहे. सरकारच्या या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिलं जात आहे. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या शासनाच्या नेमक्या योजनाकोणत्या आहेत, याबद्दल आपण जाणून घेऊ या.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना.

सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळते. महाराष्ट्र सरकारी कर्मचारी, अधिकारी किंवा ज्यांचे उत्पन्न दरमहा ३० हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. योजनेतंर्गत शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी, विविध कार्यकारी सहकारी संस्थां ग्रामीण बँकांकडून घेतलेलं पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केलं जातं.

पीएम किसान सन्मान निधी योजना

योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना हप्त्यांमध्ये पाठवले जातात. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन ३ वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. अधिक माहितीसाठी शेतकरी बांधव हेल्पलाइन क्रमांक 1800115526 किंवा 155261 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

पीएम किसान मानधन योजना

सरकार पीएम किसान मानधन योजनेंतर्गत दर महिन्याला शेतकऱ्यांना ३ हजार रुपये पेन्शन देत आहे. या योजनेसाठी केवळ १८ ते ४० वयोगटातील शेतकरी पात्र आहेत. हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

पंतप्रधान पीक विमा योजना

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. कीड, नैसर्गिक आपत्ती आणि रोगांमुळं पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकार विनाअनुदानित पिकांसाठी प्रीमियम सबसिडी देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *