शिरपूर तालुक्यात पिकलेली केळी सध्या देशाबाहेर चांगलाच भाव खात असल्याचे दिसून येत आहे, शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथे सुदाम करंके व कैलास करंके यांनी त्यांच्या शेतात पिकवलेली केळी ही थेट इराण मध्ये निर्यात होत असून, त्या ठिकाणी त्या केळीला उत्तम दर देखील मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील प्रगतशील शेतकरी सुदाम करंके व कैलास करंके या दोघं भावांनी केळीचे 4500 रोपे शेतात लावून चांगल्या पद्धतीने पाणी व खतांचे व्यवस्थापन करून त्यांनी 42 टन केळी इराण देशाच्या बाजारात निर्यात केली आहे, त्यांच्या केळीला 2121 रुपये प्रति क्विंटल दराने भाव मिळाला आहे.
एकीकडे बदलत्या हवामानाने वादळ,गारपीट,अवकाळी पाऊसाने शेतकरी त्रस्त असुन, दुसरीकडे सूदाम करंके व कैलास करंके या भावांनी केळी लागवड संदर्भात कृषी विज्ञानाचा अभ्यास करून व पिकांची चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करून शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील केळी इराण देशाच्या बाजारात पाठवली आहे.
बेदाण्याचा भाव वाढला..
पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणे सौदे बाजारात उच्चांकी 400 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला. बेदाणे सौदे बाजारात पाटकूल येथील शेतकरी नितीन गावडे यांच्या बेदाण्याला उच्चांकी 400 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे. हा दर बेदाणा सौदे बाजारातील आजपर्यंतचा सर्वाधिक दर मानला जात आहे.