लोकसभा इलेक्शन 2024 :- महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?; भाजप ३४, शिवसेना १०, राष्ट्रवादी ४ जागा लढवण्याची शक्यता…

Share

24 Taas न्युज नेटवर्कर

लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्याआधी जागावाटपाचा तिढा सुटावा असे प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुरु आहेत. दोन्ही बाजूला मॅरोथॉन बैठका सुरु आहे. महायुतीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी खुद्द अमित शाह मुंबईत आले होते. दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही चर्चा केली. यावेळी ३४-१०-४ असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे.किती जागा जिंकू शकता, त्या जिंकणाऱ्या जागांची यादी द्या, असं अमित शाह यांनी सांगितल्याची माहिती समोर येत आहे. आपल्यासोबत जे खासदार आले त्यांना पुन्हा तिकीट देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. मात्र काही खासदारांना संधी देता येणार नाही. त्यांचं भविष्यात पुनर्वसन केलं जाईल, अशा शब्द अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती आहे. सकाळने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबस सध्या एकच खासदार आहे. मात्र तरीही अजित पवार यांनी जास्तीच्या जागांची मागणी केली आहे. मात्र जिंकून येतील तेवढे मतदारसंघ सांगा, असं अमित शाह यांनी अजित पवारांना सांगितल्याची माहिती देखील समोर येत आहे. बारामती, रायगड, शिरुर, कोल्हापूर या जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादीने केल्याची माहिती मिळत आहे.

जागा अदलाबदलीचा प्रस्ताव

भाजपने मित्रपक्षांसमोर काही जागांची आदलाबदल करण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे. काही उमेदवारांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवी, असा देखील प्रस्ताव आहे. भाजपला ४०० हून अधिक जागा जिंकायच्या असतील तर हे सर्व करावं लागेल. त्यामुळेच भाजप ३४, शिवसेना १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा असा प्रस्ताव भाजपने समोर ठेवल्याचं कळतंय.

शिवसेनेने मुंबईत एकच जागा लढावी

शिवसेनेने मुंबईत सहापैकी एकच जागा लढावी असा प्रस्ताव भाजपने ठेवल्याचं कळतंय. मात्र यामुळे शिवसेनेत नाराजीची सूर आहे. तीन जागा लढू असा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. जिथे आमचे विद्यमान खासदार आहेत, त्या जागा देण्याचा प्रश्नच नाही, असंही देखील शिवसेनेचं म्हणणं असल्याची माहिती समोर येत आहे.

मित्रपक्षांना योग्य सन्मान देऊ- फडणवीस

आमचे दोन्ही सहकारी आहेत त्यांना आम्ही योग्य सन्मानाप्रमाणे जागा देऊ. त्यामुळे समोर जे आकडे येतात ती पतंगबाजी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर शिवसेनेला जेवढ्या मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला हव्यात, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *