फिर्यादीलाच पोलिसांनी केली अमानुष मारहाण व्हिडीओ व्हायरल पातुर्डा बीट जमादार नंदकिशोर तिवारी निलंबीत…

Share

V24 Taas न्युज नेटवर्कर

संग्रामपुर प्रतिनिधी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या महाराष्ट्र पोलिसांच्या श्लोग्ना विरुद्ध एका पोलिस हेड कॉन्टेबलने कृर्ती केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात आरोपीनेच व्हायरल केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील तामगाव पोस्टे मध्ये घडली. यामुळे बुलडाणा पोलिसांच्या फिर्यादीलाच अमानुष मारहाण केल्याचा अजब कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे.संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तामगाव पोस्टे हद्दीतील पातुर्डा येथील शेख मतीन शेख मोबीन हा फिर्याद देण्यासाठी ठाण्यात आला होता. दरम्यान त्याच्या विरुद्धच हेकॉ नंदकिशोर तिवारी यांनी १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली. व थर्ड डिग्री वापरुन अमानुष मारहाण केली. फिर्याद देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीलाच पोलिसांनी मारहाण करतांनाचा व्हिडीओ आरोपीने बनवला. व व्हायरल केला. बुलडाणा पोलिसांचा हा अजब कारभार समोर आल्याने जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मारहाण झालेल्या फिर्यादीचे नाव शेख मतीन असे आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी त्वरीत आदेश देवून नंदकिशोर तिवारी ह्या हेड कॉन्टेबलचे निलंबन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *