V 24 Taas
परभणी जिल्ह्यात एका विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आहे. हुंड्याचे उर्वरित पैसे आणि नवीन दुचाकीसाठी महिलेस त्रास दिला जात असल्याने तिने टाेकाचे पाऊल उचलले. दिव्या वाघमारे (20) असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती पूर्णा पाेलिसांनी दिली.पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिव्या वाघमारे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यांना त्यांचे पती व सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असे. त्यातूनच त्यांनी टाेकाचे पाऊल उचलले अशी तक्रार दिव्या यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
या तक्रारीनूसार दिव्या वाघमारे यांचे पती आणि त्यांच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. पूर्णा पाेलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान दिव्या वाघमारे यांच्या निधनाने परिसरात शाेककळा पसरली आहे.