V 24 Taas न्युज नेटवर्कर
अकोला:- वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीसोबतच्या जागा वाटप तिढ्यावर अकोल्यात बॅनरबाजी सुरुये. अकोलेकरांच्या नावाने महाविकास आघाडीला सवाल करणारे शहरभर बॅनर लागलेत. २ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंतच्या महाविकास आघाडीच्या बैठकांत वंचितला दूर का ठेवले? ३० जानेवारीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधीला बैठकीचे बाहेर का बसवले? असे अनेक सवाल या बॅनरच्या माध्यमातून महाविकास आघाडीला विचारल्या गेलेत.
दरम्यान अकोला शहरातील नेहरू पार्क, अशोकवाटिका, कृषीनगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी या आशयाचे बॅनर लावल्या गेले आहे. बॅनर लावणारे कोण?, याची अकोलेकरांना आता उत्सुकता लागलीय. लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधीही घोषित होऊ शकतात. मात्र अजूनही महाविकास आघाडीचा जागावाटपा संदर्भातील तिढा सुटला नाही. अशातच अकोला शहरात महाविकास आघाडीला अकोलाकर नागरिकांनी होर्डिंग्जच्या माध्यमातून सवाल उपस्थित केलाय.या प्रश्नात अकोलाकरांनी म्हटले की, महाविकास आघाडी जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे.
तर २ फेब्रुवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत अंतर्गत बैठका आणि चर्चेतून वंचितला दूर का ठेवले. याचे उत्तर द्या, वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीचा भाग असेल, तर अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा का जाहीर केला नाही? काँग्रेस या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवण्याची तयारी का करत आहे?
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला जाणीवपूर्वक हारणाऱ्या 2 जागा का देऊ केल्या आहेत? त्या जागा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष गेल्या 15-20 वर्षांपासून जिंकलेल्या नाहीत. त्या जागा वंचित बहुजन आघाडीच्या माथी मारण्याचा का प्रयत्न केला जातोय? असा सवाल ही या बॅनरच्या माध्यमातून विचारला गेलाय.अकोला शहरातील रतनलाल प्लॉट, अशोक वाटिका, बस स्टँड, अकोला पंचायत समिती, नेहरू पार्क, कृषी नगर, अकोला जिल्हा परिषदे जवळ हे बॅनर्स लागले आहेत.अकोल्यातील नागरिकांमध्ये वंचितला जाणीवपूर्वक बाहेर ठेवल्या जात असल्याची चर्चा होत आहे.