आनंदाची बातमी! राज्यातील 4 कोटीहून अधिक जुनी कागदपत्रे आता ऑनलाइन…

Share

V 24 Taas न्युज नेटवर्कर

सध्या जमिनीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामिण आणि शहरी जमिनींचे भाव गननाला भिडले आहेत. कारण जमिनीच्या खरेदी विक्री व्यवसायाला महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध शासकीय प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनी शासन देखील नागरिकांकडून बाजार भावांनी खरेदी करीत आहे. या सगळ्या जमिनीत्या व्यवहारांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे जमिनीचे कागदपत्र. हे जमिनीचे कागदपत्रा आता आपण ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकतो. आज आपण शासनाच्या या सुविधेबाबत जमिन विषयक

दस्तावेज ऑनलाईन करण्याबाबत सरकारचे धोरणभारत सरकारने नागरिकांना ऑनलाइन अधिकार अभिलेख उपलब्ध करून देण्याचा निर्णय

सन 2011 साली घेतला होता. आणि त्यानुसार राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमानुसार जिल्हानिहाय विभागणी करून फेरफार, सातबारा, आठ-अ, क-ड-ई पत्रक, पेरे पत्रक, हक्क नोंदणी पत्रक, रेकॉर्ड हक्क पत्रक, इनाम पत्रक, जन्म- मृत्यू, लेजर बूट, खासरा पत्रक, जोड तक्ता, कुळ नोंदणी, गाव नकाशा, टिपण अशा तब्बल 23 प्रकारच्या कागदपत्रांचे तहसील स्तरावर संगणकीकरण करण्यात आले आहे.

जमीन विषयक कोणकोणती कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध आहेत?

महाभूमी या शासकीय वेबसाईटवर जमिनविषय पुढील कागदपत्रे उपलब्ध आहेत. हक्क नोंदणी वही, आकारफोड, कजाप, ताबेपावती, गुणाकार पुस्तक, दशमान, शेतपुस्तक, पुरवणी पत्रिका, शेतवार, पोट हिस्सा पत्रक- टिपण, निस्तार, चौकशी, शहर सर्वेक्षण पुस्तिका अशा सुमारे 20 पेक्षा अधिक कागदपत्रांचे भूमिअभिलेख स्तरावर संगणकीकरण करण्यात येत आहेत.

जमिन विषय कागदपत्रे ऑनलाईन कुठे उपलब्ध होतात?

तुमच्या जमिनविषयक कागदपत्र तुम्हाला ऑलाईन पहायचे असल्यास ते तुम्हाला भूमी महाभिलेख या विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येतील. तसेत ईमहाभूमी या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर देखील तुम्ही land record तपासू शकता. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही जमिन विषयक कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकता. महाराष्ट्रात तहसील स्तरावर नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव, ठाणे या जिल्ह्यांमधील तब्बल तीन कोटी 73 लाख 198 अभिलेखांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तसेच, सातारा, नंदूरबार, गोंदिया, लातूर, जालना, अमरावतीतील भूमिअभिलेख स्तरावर 4,03,350 अभिलेख डिजिटल स्वाक्षरीयुक्त करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर शासनातर्फे 3,77,03, 548 कागदपत्रांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे.

जमिनीची कागदपत्रे ऑनलाईन मिळाल्यामुळे नागरिकांना होणारे फायदे.

घरबसल्या त्यांच्या जमिनीची कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पाहता येत आहेत.नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये जमिनीच्या कागदपत्रांसाठी सतत हेलपाटे घालावे लागत ते आता बंद होऊन. नागरिक घरच्या घरी त्यांच्या त्यांच्या जमिनीची कादगपत्रे मिळवीत आहेत. Online land Recordsजमिनीची कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे भ्रष्टाचाराला खूप मोठ्या प्रमाणात आळा घातला गेला आहे. कारण याआधी जमिनमालक किंवा शेतकरी त्यांच्या जमिनीचे कागदपत्रे मिळविण्यासाठी तहसिल कार्यालयात जात असत तेव्हा त्यांची कागदपत्रे देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असे, तसेच पैशांची देखील मागणी केली जात असे. या त्रासाला कंटाळून नागरिक बरेचदा तहसिल कार्यालयात जाणे टाळत असत किंवा त्यांचे जमिनीचे कागदपत्रे मिळविण्याचे काम पुढे ढकलत असत. त्यात नागरिकांचे नुकसान होत असे. परंतु आता जामिनीची सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होत आहे. जमिनीच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन झाले नव्हते तेव्हा अनेकदा जमिन विषयक कागद गहाळ होत असत. त्यामुळे नागरिकांना त्याचे नुकसान भोगावे लागत असे, परंतु आता हि देखील चिंता मिटली आहे. जमिनीसंबंधीची सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळत असल्याने जमिनीची कागदपत्रे गहाळ होण्याचा धोका कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *