V 24 Taas न्युज नेटवर्कर
सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्याने अनेक कामे सोपी होतात. त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून आता आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्यास दंड भरावा लागत आहे.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ होती. जर कोणी ३० जून २०२३ नंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले तर त्याला दंड भरावा लागला आहे. सरकारने आतापर्यंत जवळपास कोट्यवधींचा दंड आकारला आहे.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून अजूनही ११.४८ कोटी पॅन कार्ड आधाप कार्डशी जोडले गेले नाहीत. त्यामुळे या लोकांकडून दंड आकारले गेले आहेत.
३० जून २०२३ नंतर पॅन-आधार लिंक केल्यानंतर त्या व्यक्तींना १ हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. १ जुलै २०१३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेल्या नागरिकांकडून तब्बल ६०१.९७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आयकर विभागाने याबाबत माहिती दिली आहे, जर करदात्यांनी त्यांचे आधार कार्ड पॅनशी लिंक केले नाही तर ते १ जुलै २०२३ पासून निष्क्रिय होईल. या पॅन कार्डवर कोणताही परतावा दिला जाणार नाही. त्यामुळे १ हजार रुपयांचा दंड भरुन तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करु शकता.